रेवणसिध्द महास्वामीजींच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार;अंत्यदर्शनासाठी भाविकांची गर्दी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१५ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील श्री.बसवलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती लिंगैक्य रेवणसिध्द महास्वामीजीं यांच्यावर शुक्रवारी हजारो
भाविक व मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र- कर्नाटक राज्यातील शंभर पेक्षा अधिक महास्वामीजींच्या उपस्थित होते.गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ते लिंगैक्य झाले.ही बातमी वाऱ्यासारखी समजताच राज्याच्या कानाकोपऱ्यातून महास्वामीजींच्या अंतीम दर्शनासाठी सकाळ ६ पासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या.दुपारी २ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून अड्ड पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.
संपूर्ण गावातील लोकांनी आपापल्या घरासमोर पाणी मारून रांगोळी काढून,पुष्पवृष्टी करून अंतिम नमन करून श्रद्धांजली वाहिली.सुमारे ५ तास चाललेली मिरवणूक सायंकाळी ७ वाजता विरक्त मठात पोहचली.उपस्थित सर्व महास्वामीजींच्या सानिध्यात धार्मिक विधीने अंत्यविधी पार पडला.सर्व सदभक्तांना श्रीमठात महाप्रसादची व्यवस्था करण्यात आले होती.या शिवाय गावातील प्रत्येक गल्लीत युवक मंडळ कडून पाणी,शरबत,अल्पोपहार याची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी गुरूपादलिंग महास्वामीजी बबलाद,श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसुर,चनमल्ल महास्वामीजी तोळणूर,शांतलींग महास्वामीजीं दुधनी,गंगाधर शिवाचार्य आंबेजोगाई,बसवलिंग महास्वामीजी अक्कलकोट,नीलकंठ शिवाचार्य मैदर्गी, नीलकंठ महास्वामीजी इलकल,महांत महास्वामीजी मैंदर्गी समवेत शंभरपेक्षा अधिक महास्वामीजी उपस्थित होते.
अंतिम दर्शनासाठी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी,आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी,मल्लिकार्जुन पाटील,मल्लिनाथ भासगी,महिबूब मुल्ला,अशपाक बळोरगी,सतीश प्रचंडे, गिरीमल्ल गंगोंडा,संजय शरणार्थी,धनराज धनशेट्टी,मल्लिनाथ कल्याण,बसवराज नागलगांव, बसवराज
मंटगी, धरेप्पा तोळणूरे,वैजनाथ खिलारी, महेश हंद्राळमठ,चिदानंद मठपती,विद्याधर गुरव,कल्याणी गंगोंडा,श्रीशैल फुलारी,काशीनाथ धनशेट्टी,बसवराज धनशेट्टी आदींची उपस्थिती होती.
तूप पुरण पोळीचे
मठ म्हणून प्रसिद्ध
नागणसुरचे मठ हे सीमावर्ती भागात तूप
पुरण पोळीचे मठ म्हणून प्रसिद्ध आहे.याचे
सर्व श्रेय हे लिंगैक्य रेवणसिद्ध महाराजांना जाते.त्यांच्यामुळे नागणसुर गावाला वलय प्राप्त झाले,अशा भावना मान्यवरांनी शोक सभे प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या.