अक्कलकोट,दि. २० : अक्कलकोट हे लाखो स्वामी भक्तांचे श्रध्दास्थान आहे.शहर आणि ग्रामीण भागातील विकासासाठी शिवसेना पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. अनेक प्रकारच्या विकास कार्यक्रमासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अक्कलकोट शहरातील विजय चौकाला देण्याबाबतचा प्रस्ताव स्थानिक नगर परिषदेने मंजूर केला होता. मात्र यावर अजून कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत
नाही.या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला डॉ. नीलम गोर्हे यांनी सूचना दिल्या आहेत.नुकतीच त्यांनी अक्कलकोट
येथे भेट दिली. श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये डॉ.गोऱ्हे यांनी वटवृक्ष मंदिरात दर्शन घेतले. स्वामींची विधिवत पूजा केली.मंदिराच्या आणि स्वामींच्या उपासनेसाठी देणगीचा धनादेश मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्त केला.यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभावे. कोरोना सारख्या संकटापासून दूर राहावे, याकरिता सर्वांना शक्ती देण्याची प्रार्थना यावेळी त्यांनी स्वामीचरणी केली.त्यावेळी त्या बोलत होत्या.डॉ. गोऱ्हे यांचा साहित्य पंढरी विकास दौरा सुरू असून या अंतर्गत त्या सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर या ठिकाणी भेट देऊन स्थानिक जिल्हा प्रशासनाची विविध विकासकामांबाबत चर्चा करत आहेत.कोवीड कालावधीमध्ये जिल्हा स्तरावर राबविण्यात आलेल्या उपाययोजना आणि सामान्य जनतेला देण्यात आलेला लाभ याबाबत आढावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या घेत आहेत.या अनुषंगाने काल अक्कलकोट येथे त्यांनी भेट दिली.त्यांच्यासोबत शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, अस्मिता गायकवाड, शर्मिला येवले, राज्य महिला आयोग सदस्या संगीता चव्हाण,शहर प्रमुख योगेश पवार आदी उपस्थित होते.