सचिन पवार
कुरनूर, दि.३ : एकीकडे भोंग्यावरून हिंदू – मुस्लीम वाद चिघळत असताना अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे मात्र रमजान ईदचे औचित्य साधून खास हिंदू बांधवांसाठी मुस्लिम समाजाने दोनशे लिटर शिरखुर्माचे आयोजन केले होते.या घटनेने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम समाजात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले आहे. सध्या राज्यात भोंग्यावरून वातावरण दूषित आहे.यातून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल असे कृत्य होऊ नये.हिंदू-मुस्लीम एकता टिकून राहावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. हिंदू-मुस्लीम बांधवामध्ये बंधुत्वाची भावना आणि ऐक्याचा संदेश जनतेला जावा. या हेतूने हा उपक्रम यावर्षी राबविला आहे. आणि यापुढे ही अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक वर्षी राबवू ,अशी माहिती कमिटीने दिली आहे.यामध्ये दोनशे ते अडीचशे हिंदू बांधवानी शिरखुर्माचा लाभ घेतला.आणि हिंदू बांधवांनी सुद्धा गळाभेट करून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाची किणी गावामधे हिंदू मुस्लिममध्ये एकोप्याची भावना दिसून येत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे
सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी सरपंच विनायक जाधव, ग्रामपंचायत सदस्य शेखर सोनकांबळे,शंकर व्हनमाने ,रत्नशील जैनजांगडे, संतोष अंबाडे, विजय कांबळे, महादेव कोटमाळे, गजेंद्र जाधव,जैनुद्दीन मुल्ला,सलीम मुल्ला,लालडू फुलारी, खलिल मत्तेखाने, हुसेन बावाशे, निसार मत्तेखाने, मुस्तफा सय्यद,समीर मत्तेखाने, मंजूर मत्तेखाने,नुरद्दीन मत्तेखाने आदी मान्यवर उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वीरित्या साठी निसार मत्तेखाने, अमीन बावाशे, अल्लाउद्दीन बावाशे,मंजूर मत्तेखाने, सलीम मुल्ला ,सद्दाम जमादार,शहबाज मत्तेखाने, खैयुम जमादार, अब्बास मत्तेखाने आदी मुस्लिम बांधवानी परिश्रम घेतले.
माणुसकी
हाच खरा धर्म
मध्यंतरी हिजाब प्रकरणावरून देशात चांगलेच वातावरण तापले. आता भोंग्यवरून वाद वाढत असून यामध्ये हिंदू-मुस्लीममध्ये फूट पडण्याचा प्रयत्न सुरू आहे.या विषयाकडे लक्ष न देता आपल्यामध्ये एकता आणि आपली संस्कृती कशा पद्धतीने टिकून राहील याकडे लक्ष द्यावे आणि माणुसकी हाच खरा धर्म समजून हिंदू-मुस्लीम मध्ये एकता राहावी. या उद्देशाने हा उपक्रम आम्ही राबवला आहे.
यासिन बावाशे( युवक)