बाणेगाव यांनी पक्षभेद न करता लोकांची कामे मार्गी लावली; चपळगाव येथे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
अक्कलकोट, दि.९ : त्याग,निष्ठा आणि निस्वार्थी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे स्वर्गीय सुर्यकांत बाणेगाव यांची चपळगाव परिसरात लोकनेते म्हणून ओळख झाली.कधी त्यांनी पक्षभेद केला नाही.समाजकारण व राजकारणात एक वेगळा ठसा निर्माण करून या भागात अनेक लोककल्याणकारी कामे केली,असे गौरवोद्गार सरपंच उमेश पाटील यांनी काढले.
सोमवारी,चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथे लोकनेते स्व.सरपंच सूर्यकांत बाणेगाव यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना पाटील म्हणाले,सतत सहकार्य व मदतीची तयारी त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते.ते सामान्य कुटुंबातुन पुढे आलेले असल्यामुळे सर्वसामान्य माणसाबाबत त्यांच्या मनात नेहमी आदराची व सहकार्याची भावना राहायची.त्यांच्याकडे समस्या घेवुन येणारा प्रत्येक व्यक्ती हा समाधानी होवुनच परत जायचा.याबाबत अनेक उदाहरणे मी स्वतः पाहीले आहेत. म्हणुन त्यांचे नाव आजही सर्व सामान्याच्या मनामध्ये घर करून राहिले आहे,असेही ते म्हणाले.बाणेगाव यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा,मनमिळाऊ,दूरदृष्टी होती.तसेच कधी त्यांनी जाती,धर्मभेदाला थारा दिला नाही.अतिशय संयमी व सर्वांना बरोबर घेवुन जाणारे नेते म्हणून परिचित होते,असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.युवा नेते बसवराज बाणेगाव म्हणाले,चपळगाव व परिसरात एस.बी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले आहे. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी यापुढेही प्रतिष्ठान कार्य करत राहील.उपसरपंच डॉ.अपर्णा बाणेगाव, ओमराज बाणेगाव हेही चांगले काम करत आहेत.
प्रारंभी बाणेगाव यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी रविकांत पाटील यांनी बाणेगाव यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविकांत पाटील ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश पाटील,ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, सिद्धाराम भंडारकवठे ,सोसायटी चेअरमन नंदकुमार पाटील ,संस्था कार्याध्यक्ष पंडित पाटील,माजी चेअरमन महादेव वाले,विश्वनाथ बाणेगाव ,भगवान जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रावण गजधाने ,परमेश्वर वाले, मल्लिनाथ सोनार, प्रकाश बुगडे विष्णुवर्धन कांबळे सिद्धाराम भंगे , उमेश सोनार ,सोमशंकर बानेगाव,कुमार दुलंगे ,परमेश्वर भूसूणगे, भीमाशंकर दुलंगे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर आभार सुरेश सुरवसे यांनी मानले.