ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचा जन्मदिवस यंदा श्री क्षेत्र देहूगाव येथे साजरा होणार ;डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांची माहिती

 

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोटनिवासी परमसद्गुरू श्रीगजानन महाराज , शिवपुरी ,अक्कलकोट यांचा जन्मदिवस यंदा श्री क्षेत्र देहूगांव येथे साजरा होणार असल्याची माहिती विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी दिली.
हा कार्यक्रम १६ मे रोजी संत तुकाराम महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम होत आहेत.परमसद्गुरू श्रीगजानन महाराज विश्वभरात ‘श्री’ जी नावाने ओळखले जातात.सत्यधर्म प्रवर्तक, अग्निहोत्राचे प्रणेते असल्याकारणाने अखिल मानवाच्या कल्याणासाठी वेदप्रतिपादित अग्निहोत्र विधी दिला.आज जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व देशांत असंख्य व्यक्ती आणि कुटुंबे नित्य अग्निहोत्र आचरण करुन आपल्या जीवनात स्वास्थ्य आणि सुखशांतीचा प्रकाश पसरवून आपली जीवने उजळून घेत आहेत,असे डॉ.राजीमवाले यांनी सांगितले.यावर्षी ‘श्री’ जींचा जन्मदिवस सामूदायिक अग्निहोत्र करून साजरा करण्यात येणार आहे.जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवार दि. १६ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्री क्षेत्र देहूगांव येथे परमसदगुरु श्रीगजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचे आगमन – दर्शन,६.०० वाजता भजन-गायन,६.३० वाजता सर्व नागरिक व  साधकांचे आगमन,६.५८ वाजता सायं.अग्निहोत्र व ध्यान,७ ते ८ वाजता डॉ. राजीमवाले यांचे मार्गदर्शन,रात्री ८ ते ९ या वेळेत समारोप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!