वेस्टइंडिज येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी स्त्रीरोग तज्ञ डॉ.मिलिंद शहा यांना निमंत्रण; सोलापूरला पहिल्यांदा बहुमान
सोलापूर,(प्रतिनिधी) – वेस्ट इंडिज या देशातील पुंता काना डोमिनिकन रिपब्लिक मध्ये दि. 1 ते 5 जून या दरम्यान होणाऱ्या स्त्रीरोगावरील पेरिनेटल मेडिसिन या विषयावर जागतिक परिषद होणार आहे त्या परिषदेत जगातील 30 देशातील स्त्रीरोग तसेच बालरोग तज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरचे प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. मिलिंद शहा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. मिलिंद शहा यांच्या माध्यमातून अशा परिषदेत सहभागी होण्यासाठी सोलापूरला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे.
गरोदर महिलां अनेकदा वेळेआधी किंवा वेळेनंतर प्रसुत होतात. त्यामुळे स्त्री व नवजात अर्भक यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. हे अकाली बाळंतपण टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर जगभरातील स्त्रीरोग व बालरोग तज्ञ या जागतिक परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. सोलापूरचे डॉ. मिलिंद शहा गेल्या 30 वर्षापासून सोलापूर शहर जिल्हा आणि मुंबई शहरातील विविध रुग्णालयात रूग्णांना सेवा देत आहेत. त्याच बरोबर फॉग्सी, आयसोपार्ब, आयएमए अशा विविध संस्था संघटनांवर अध्यक्ष आणि विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. जगातील अमेरिका, इंग्लंड, कॅनडा,चिली, फ्रान्स, स्विर्त्झलॅन्ड, जपान, थायलँड, दक्षिण अफ्रिका, चीन, पोर्तुगाल, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, मॉरिसियस,फिलिपाईन्स,दुबई, सर्बिया, ब्राझील, दक्षिण कोरीया, पेरू अशा 25 ते 30 देशांमध्ये स्त्रीरोग आणि बालरोग या विषयावर आजपर्यत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.दि. 1 ते 5 जून या दरम्यान पुंता काना डोमिनिकल रिपब्लिक वेस्ट इंडिया येथे होणाऱ्या या जागतिक परिषदेतील सहभागी स्त्रीरोग व बालरोग तज्ञांना व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मिलिंद शहा यांना निमंत्रीत करण्यात आले असून सोलापूरला हा पहिल्यांदाच बहुमान मिळाला असल्याने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.