---Advertisement---

कुरनूर येथील शिबिरात ३८ जणांचे रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

अक्कलकोट,दि. ३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ३८ जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,माजी सरपंच अमर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात रक्ताचा तुटवडा बघून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी मोलाचे सहकार्य करत या शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला.या सर्व रक्तदात्यांना आयोजकांकडून टिफिन डबा भेट म्हणुन देण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून ही परंपरा कायम आहे.आणि यापुढे देखील ही परंपरा कायम राखून अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून घेऊ, असे उत्सव समितीचे अध्यक्ष राम शिंगटे यांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मारुती खांडेकर, लक्ष्मण कुंभार, आनंद खांडेकर, विष्णू खांडेकर,बालाजी सलगरे, प्रमोद खांडेकर एकनाथ बेडगे, शुभम चेंडके,विजय खांडेकर आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!