ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 

अक्कलकोट,दि.६ : रिपब्लिकन पार्टी
ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त भीमनगर अक्कलकोट येथे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभास प्रमुख उपस्थिती
रिपाई प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांची होती.अक्कलकोट तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे पेलून अक्कलकोट तालुका व शहरात रिपब्लिकन पक्ष मोठ्या प्रमाणात कार्यरत करून तालुक्यातील अनेक प्रश्न मोर्चे आंदोलने करून मार्गी लावून पक्ष जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे,अशा शब्दात विविध मान्यवरांनी त्यांचा गौरव केला.अक्कलकोट तालुक्यातील सर्व समाजातील जनतेला सोबत घेऊन चालणारे नेते म्हणून त्यांची ओळख झाली आहे,असे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे यांनी सांगितले. यावेळी नननु कोरबू मित्र परिवाराच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.मडीखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात व तालुक्यात ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्कार सोहळ्यास स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी ,माळी महासंघाचे संतोष पराणे शबाब कोरबु, रासप चे सुनील बंडगर, कोळी समाजाचे अध्यक्ष सिद्धाराम कोळी, नगरसेवक नागराज कुंभार, उद्योगपती चौडप्पा घोसले, शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार,रासपचे तालुकाध्यक्ष दत्ता माडकर ,अंकुश चौगुले, बसवराज सोनकांबळे,समीर नदाफ ,सर्व समाज बांधव,शहरातील विविध संघटना ,विविध समाज अध्यक्ष, रिपाइंचे सर्व शाखा प्रमुख ,पदाधिकारी कार्यकर्ते रिपाई नेते राहुल रुही,रिपाई शहर अध्यक्ष प्रसाद माने,सैदप्पा झळकी,आप्पा भालेराव, सुरज सोनके,गुरु मगी,अंबादास गायकवाड चंद्रकांत गायकवाड विजय गायकवाड संदीप गायकवाड अंबादास बनसोडे प्रकाश किरात राम बाळशंकर विशाल सोनकांबळे विक्रम सोनकांबळे,रमेश बनसोडे , विशाल बनसोडे, अमित बनसोडे ,रोमीत मडीखांबे,शुभम मडीखांबे,नागेश मडीखांबे,अजय मडीखांबे,दिनेश रूही,मुकेश सक्सेना,रवी सलगरे,ज्ञानेश्वर बनसोडे,अप्पू काळे,राजू गवळी,लवा गायकवाड,सिद्धाराम मडीखांबे,आकाश मडीखांबे,बंटी मडीखांबे वीरपक्ष माने,शिवानंद मडीखांबे,शंकर घाटगे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरच्या
हस्ते वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या समाधान शिबिर मधील रेशन कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!