परिश्रम घेतल्याशिवाय जीवनात यश नाही : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ; माळी समाजातील गुणवंतांचा सत्कार
अक्कलकोट, दि.११: विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत व परिश्रम घेतले तर जीवनात यश हमखास मिळते,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. वीरशैव माळी समाज शहर अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी होते.यावेळी दुधनी बाजार समितीचे चेअरमन प्रथमेश म्हेत्रे , श्री स्वामी समर्थ सूतगिरणी संचालक लक्ष्मण हंजगे,श्री स्वामी समर्थ सूतगिरणी संचालक सतीश ईसापुर, डॉ. बसवराज चिणकेकर, सुनील इसापुरे,युवा नेत्या शितलताई म्हेत्रे,सुनिता हडलगे, सुनंदा भकरे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,जरी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी असलो तरी आपल्यातही टॅलेंट आहे त्याचा पुरेपूर उपयोग करत आपण मोठ्या आत्मविश्वासाने सर्व प्रसंगांना सामोरे गेल्यानेच आपणास मोठा यश मिळत असते, असे आपल्या मनोगत म्हणाले.
बसवलिंग महास्वामीजी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे.चांगले गुण मिळाले म्हणून हरळुन जाऊ नये,जीवनामध्ये यापेक्षाही मोठ्या स्पर्धेला सामोरे जायचे आहे माळी समाजातील विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देण्यासाठी समाजाच्यावतीने सत्कार समारंभ कार्यक्रम घेतला हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे यामुळे समाजातील मुलांना एक प्रेरणा मिळत असते,असेही ते म्हणाले.यावेळी माळी समाजातील दहावी आणि बारावी शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरणप्पा लिंबितोटे ,काशिनाथ गोळळे,प्रा. शिवशरण अडवितोटे , शिवशंकर बिंदगे, बाबुराव रामदेव,परमेश्वर देगाव ,बाळकृष्ण म्हेत्रे, राजू लिंबितोटे, विजयकुमार हडलगी,डॉ.प्रशांत चिंचोली आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण म्हेत्रे यांनी केले तर आभार डॉ.चिणकेकर यांनी मानले.