---Advertisement---

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रकडून पंजाबचा पराभव,अक्कलकोटच्या सिताराम भांडची चमकदार कामगिरी

On: September 13, 2022 10:13 PM
Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१३ : ३५ वी सीनिअर
राष्ट्रीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२२ जालंदर,पंजाब येथे पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात पंजाबचा पराभव करत सुवर्ण पदक मिळविले.यात महाराष्ट्रने पंजाबचा ३ – २ होमरनने पराभव केला.सुवर्ण पदक विजेत्या संघात सोलापूर शहरातील अक्षय हवळेचा आणि अक्कलकोट तालुक्यातील सीताराम भांड
ह्या खेळाडूंचा समावेश होता.भांड हा अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी गावचा आहे.राष्ट्रीय पातळीवर भांड यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अक्कलकोट तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी, युवा नेते बसवराज बाणेगाव आदी नेते मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!