---Advertisement---

राष्ट्रीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातून दोन सरपंचांची निवड

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१६ : पुणे येथे २२ व २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाश्वत विकास ध्येयांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातील दोन सरपंचाची निवड करण्यात आली आहे.यात गोगाव येथील वनिता सुरवसे तसेच सांगवी खुर्द येथील यमुनाबाई काळे
या दोन महिला सरपंचांचा समावेश आहे.
भारत सरकारच्या पंचायती राज विभागाच्या सूचनेनुसार स्वच्छ व हरित ग्राम व जलसमृद्ध गाव या शाश्वत विकास देण्याच्या दोन संकल्पनावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे.यात अक्कलकोट तालुक्यातून दोन जणांची निवड करण्यात आली आहे.या कार्यशाळेत गावच्या शाश्वत विकासावर चर्चा होणार असल्याचे सरपंच वनिता सुरवसे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!