---Advertisement---

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी केला राडा

Follow Us:
---Advertisement---

नांदेड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडमध्ये ध्वजारोहण पार पडला. त्यांच्या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली पोलिस भरती झाली पाहिजे, अशी मागणी करत जोरदार घोषणा दिल्याने गोंधळ उडाला होता. पोलीस भरती झालीच पाहिजे अशी घोषणा करत विद्यार्थ्यांनी जोरदार राडा केला.

याठिकाणी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्य लाठीचार्ज केला. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आंदोलकांना कोणताही उत्तर न देता पुढे निघून जाणं पसंत केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!