---Advertisement---

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना यांनी केला खळबळजनक दावा, म्हणाले पंतप्रधान मोदी…

On: September 18, 2022 11:26 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक पार्श्वभूमीबद्दल धक्कादायक दावा केला आहे. ‘नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत. याबाबतची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल,’ असं पटोले यांनी म्हंटले आहेत.

‘देशातील जनतेला वाटतं आपले पंतप्रधान हे ओबीसी आहेत. पण तसं नाही. काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल हे लवकरच प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहेत. या संदर्भातील सर्व कागदपत्रे ते सादर करणार आहेत. मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं आहे,’ असा आरोपही पटोले यांनी केला. ‘प्रश्न केवळ मोदींच्या ओबीसी असण्याचा किंवा नसण्याचा नाही. आज संपूर्ण ओबीसी समाजच संकटात आहे, बहुजन समाज आणि देशच संकटात आहे. देशाचं संविधान संकटात आहे,’ असं पटोले म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!