रत्नागिरी : गोवा-मुंबई महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून एलपीजीची वाहतूक टँकर नदीत कोसळला. पुलाचा कठडा तोडून एलपीजीची वाहतूक टँकर नदीत कोसळला. या टँकरमधून गॅसची गळती होत असल्याने या मार्गावरची वाहतूक ही १८ तासांपासून बंद आहे.
दरम्यान या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहूतक लांजा-शिपोशी-दाभोळे-पाली मार्गे रत्नागिरी तसंच देवधे-पूनस-काजारघाटी मार्गे रत्नागिरी या मार्गे वळवण्यात आली आहे. पाली ते लांजा या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. हा महामार्ग सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.