ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा सुरू होणार ! जनतेने केलेल्या सूचनांचा आदर; श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची ग्वाही

अक्कलकोट, दि.२७ : सर्वांच्या सहकार्याने यंदापासून दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा आपल्याला पुढे चालवावयाची आहे जनतेने केलेल्या सूचनांचा आदर केला जाईल आणि त्याप्रमाणे दसरा महोत्सव सर्वसमावेशक सर्व जातीत धर्मांना एकत्रित करून राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे केला जाईल, असे प्रतिपादन अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी केले.

 

मंगळवारी, अक्कलकोट राजघराण्याच्यावतीने दसरा महोत्सवाच्या नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन अक्कलकोट कॉलेज सभागृहात करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष आणि मानकरी महेश इंगळे यांनी दसरा महोत्सवाच्या निमित्ताने कशाप्रकारे दसरा महोत्सव करण्यात येईल आणि होतो याची सविस्तर माहिती देऊन जनतेने या दसरा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. बाबासाहेब निंबाळकर यांनी दसरा महोत्सवाची राजधानीची परंपरा आणि धार्मिक विधी संदर्भातली माहिती दिली.

यावेळी माजी नगरसेवक आनंद खजुरीकर, पत्रकार मारुती बावडे डॉ. विपुल शहा, माजी प्राचार्य एस.
एम. जाधव, माजी प्राचार्य किसन झिपरे, अक्कलकोट बारासोसिएशनचे एड. हल्ले, मराठा सेवा संघाचे अतुल जाधव,डॉ विपुल शहा, सुनील खवळे ,राहुल ढोबळे, आगार प्रमुख रमेश म्हंता, अशोक जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त करून दसरा महोत्सव संदर्भात काही सूचना केल्या.यावेळी नगरसेवक बंटी राठोड, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष जितेंद्र जाजू, आशिष कदम, रमेश ग्राम,ऋषी लोणारी, डॉ.आर.व्ही पाटील, तानाजी बावणे, बंडोपंत घाडगे,कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक शरद जंगाले,शहाजी स्कूलचे मुख्याध्यापक सुदेश कांबळे, संजय भागानगरे, मुकुंद घाटगे, व्यापारी असोसिएशनचे कापसे, गौरीशंकर बकरे, विक्रांत गोडसे, संदेश शहा, विकास मोरे, सोनू कलशेट्टी, मौलाली मुल्ला, रमेश ग्राम, जयसिंह पाटील, मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी,सागर फुलारी, रोहन जिरोळे, सिध्दार्थ बिंदगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी दसरा महोत्सवा संदर्भातील नागरिकांच्या सूचनेचा सूचनेचे स्वागत केले आणि सर्वांच्या सहकार्याने दसरा महोत्सव केला जाईल, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!