दुधनी दि. २८ : घटस्थापनेच्या मुहूर्तावर चिंचोळी (मै) – अक्कलकोट एसटी सेवा बस सेवा करण्यात आली आहे,. यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, युवा नेत्या शीतल म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठ्यपुराव्याला यश आले आहे.
खराब रस्त्यांमुळे या गावात एसटी बस सेवा सुरू करण्यात आली नव्हती. यामुळे येथील नागरिक, शेतकरी, व्यापारी, शाळकरी मुले, नोकरदार यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. चिंचोळी गावाहून जिल्ह्याच्या, तालुक्याचा ठिकाणी जाण्यासाठी दुधनी किंवा रुद्देवाडीला जावून एसटी बस किंवा खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. मात्र घटस्थापनेच्या मुहूर्तावर अक्कलकोट-चिंचोळी (मैं) बस सेवा सुरू करण्यात आले. यामुळे येथील नागरिक व्यापारी शाळकरी मुलं, नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मंगळवारी पहिली एसटी बस गावात पोहोचल्यानंतर चिंचोळी (मैं) ग्रामस्थांनी बसचे पूजन करून चालक व वाहक यांचे सरपंच गौव्याबी मौला इटगी, उपसरपंच बाबुराव गड्डीकर यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार केला. यावेळी शिवानंद कलबंडी, इलाई इटगी, गणपती सोनकांबळे, नागणा कलबंडी, भीमराव गड्डीकर, नगाय्या स्वामी, शिवपुत्र गड्डीकर, बसवराज सोनकांबळे, रवि बिराजदार, बसवराज पाटील, दस्तगीर चिद्री, रमेश बिराजदारसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट – चिंचोळी (मैं) बस सेवा सुरू करण्यासाठी रमेश गड्डीकर, जी. एम. जमादार, शिवानंद कलबंडी, इलई इटगी यांनी सतत प्रयत्न केले. चिंचोळी गावात पहिल्यांदाच एसटी बस पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.