ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मातोश्री लक्ष्मी शुगरला ऊस देऊन सहकार्य करावे : म्हेत्रे ; दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.३० : अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज असून कारखान्यावरील सर्व यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याचे चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले. रुददेवाडी (ता.अक्कलकोट) येथील मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा दहावा गाळप सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले,तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे याचा विचार करून जास्तीत जास्त गाळप करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्यातील विभागवार सर्वच पातळीवर वाहन,तोडणी,यंत्रसामग्रीची तयारी चांगली केली असल्याचे म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले.

 

प्रारंभी दुपारी १२.२५ वाजता विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे , मॅनेजिंग डायरेक्टर शिवराज म्हेत्रे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शीतलताई म्हेत्रे, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, विश्वनाथ हडलगी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गाळप हंगामास प्रारंभ झाला. यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बाळासाहेब कुटे, जनरल मॅनेजर रावसाहेब गदादे, केन हेड गुरुनाथ लोहार, केन मॅनेजर खंडेराया व्हसुरे, केन मॅनेजर सिद्राम गुरव, चिफ केमिस्ट शिवपुत्र माळशेट्टी ऊसपुरवठा अधिकारी बाबुराव पाटील, चिफ अकौंटट अंबादास बल्ला, टाईम किपर मिलिंद शिरसे, परचेस ऑफीसर सचिन कुलकर्णी, स्टोअर किपर श्रीकांत लोहार, सुरक्षा अधिकारी शिवानंद निंबाळ सर्व अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बाधंवाची मोठी उपस्थित होती.

१० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

यावर्षी कारखान्याने १० लाख मेट्रिक टन  ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहील.बिले वेळेवर देण्यात येतील – सिद्धाराम म्हेत्रे, चेअरमन

 

ऊस उत्पादकांना दिवाळी भेट

सभासद व ऊस पुरवठादार यांना दीपावली करीता २० किलो २० रुपये प्रति दराने साखर वाटप कारखाना स्थळावर करण्यात येणार असून सदर साखर वाटप १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान करणार आहे – शिवराज म्हेत्रे,मॅनेजिंग डायरेक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!