सचिन पवार.
कुरनूर दि २.अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गांधीजींनी देशाला दिलेल मोठ योगदान कधीही विसरता येणार नाही. गांधीजीचा आदर्श आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे सरपंच व्यंकट मोरे म्हणाले. यावेळी मतदार नोंदणी व दुरुस्ती चालू आहे याचा लाभ घ्यावा. अहिल्याबाई सिंचन योजना विहीर प्रस्ताव, घरकुल योजना, या शासनाच्या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. व ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न वाढले आहे. त्या नागरिकांनी व अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
तत्पूर्वी. पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांच्या पत्नी संतोषीताई मोरे यांचे काल ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो यासाठी पाच मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या ग्रामसभेला कुरनूर गावचे विद्यमान सरपंच व्यंकट मोरे , उपसरपंच आयुब तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंगटे, स्वामीराव सुरवसे, राजु गवळी, आप्पा शिंदे, सुरेश बिराजदार, बडेसाब शेख, योगेश निंबाळकर, दादासाहेब बेडगे व अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.