सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर आणि सुमन डायबेटिज फौडेशन याच्या संयुक्त विद्यमाने कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्यलेखनावरील आधारीत असलेला अनवट शांताबाई या कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.25 वाजता हि.ने. वाचनालयाच्या अँफी थिएटरमध्ये करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
ज्येष्ठ कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्यलेखनावर आधारीत हा संगितमय आविष्कार असून या कार्यक्रमाचे उदघाटन सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमाचे संशोधन संहिता लेखन आणि बांधणी डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले आहे. या कार्यकम्रात अभिवाचन अनुराधा कुलकर्णी, वंदना बोकील कुलकर्णी, दिपाली दातार आणि गौरी देशपांडे यांच्याकडून होणार असून या कार्यक्रमात व्हायोलिनची साथ अनुप कुलथे हे देणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने सोलापूर रंगे नेत्यांचे संगे हा मुलाखतीचा कार्यक्रम, महाकवी गदि माडगुळकर यांच्या स्मृती निमित्त काव्य जागर कार्यक्रम, महिलांसाठी श्रावण महोत्सव, श्री सूक्त ते राष्ट्र सूक्त असे विविध कार्यक्रम यापुर्वी सोलापूरकरांसाठी आयोजित करण्यात आले आहेत अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूरमधील सांस्कृतिक परंपरेची जपणूक महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने करण्यात येते त्याचाच भाग म्हणून कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्य लेखनावरील अनवट शांताबाई या अनोख्या कार्यक्रमाची मेजवाणी सोलापूरकरांसाठी आयोजित करण्यात आली असल्याचे मसाप दक्षिणच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुमन डायबेटीज फौंडेशनचे डॉ. संगीता श्रीकांत पागे यांनी केले.