ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच देण्याची अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच म्हणजे येत्या २१ तारखेला देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय दिवाळी बोनसही येत्या २१ तारखेला पगारासह जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून महागाईनं त्रस्त असलेल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत आहे. सणासाठी म्हणून राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

दिवाळी सणाच्या आधीच चालू महिन्याचा पगार आणि दिवाळीचा बोनस देण्यात यावा, अशी मागणी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर या मागणीला गंभीरतेनं घेत राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनससह पगार देण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. त्यामुळं २४ तारखेला असलेल्या दिवाळीआधी पगारासह बोनस मिळणार असल्यानं कर्मचाऱ्यांना मनसोक्त खरेदी करता येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!