शिवसेनेतील फुटीनंतर आता ठाकरे गटात भाजपमधून इनकमिंग सुरू, छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांचा ठाकरे गटात प्रवेश
मुंबई : धुळ्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला धुळ्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. धुळ्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी मोठी राजकीय ताकद आहे. यामुळे धुळ्यात ठाकरे गटाला नवीन उभारी मिळण्याची शक्यता आहे.
२०१९ साली त्यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु थोड्या मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु आता त्यांच्या मुलानं ठाकरे गटात प्रवेश केल्यानं धुळ्यातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मुलाने ठाकरे गटात प्रवेश केल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा बसला असून ठाकरे गटाला नवीन तरुण चेहरा मिळाला आहे.