श्रीहरीकोटा : भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर इस्रोने पुन्हा इतिहास रचला आहे. इस्रोकडून भारतीयांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केलं. OneWeb च्या 36 रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, ISRO ने आपले सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून मध्यरात्री 12:07 वाजता प्रक्षेपित केले.
LVM3 M2/ OneWeb India-1 Mission:
the countdown continues leading to the lift-off at 7 minutes past midnight.Watch LIVE from 11:37 pm IST today on our Website, Facebook, YouTube channels, and on @DDNational @NSIL_India @OneWeb
— ISRO (@isro) October 22, 2022
याआधी एलव्हीएम३ रॉकेटला जीएसएलव्ही मार्क रॉकेट नावाने ओळखलं जात होतं. या रॉकेटच्या लाँचसाठी २४ तासांचा काउंटडाऊन होता. या रॉकेट लाँचमधून ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण केले गेले. वनवेब ही खासगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. इस्रोने या लाँचिंगसह आता ग्लोबल कमर्शियल लाँच सर्व्हिस मार्केटमध्ये पाऊल टाकलं.
एलव्हीएम ३ लाँच केल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष म्हणाले की, ४३.५ मीटर लांबी असलेल्या रॉकेटची क्षमता ८ हजार किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची आहे. सर्वात वजनदार उपग्रह अशीही त्याची ओळख आहे. आगामी वर्षात पहिल्या सहा महिन्यात एलएमव्ही ३ मधून ३६ वनवेब उपग्रहांचा आणखी एक सेट लाँच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ब्रिटनसोबत झालेल्या १०८ उपग्रह करारांतर्गत GSLV मार्क-3 पहिल्या टप्प्यात ३६ उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यात आले. ३६ उपग्रह निव्वळ दळणवळणासाठी आहेत. या वर्षी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही रॉकेटची चाचणी घेण्यात येणार आहे.
तसेच न्यूस्पेस इंडिया लिमिटेड, अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने यापूर्वी भारती-समर्थित OneWeb या लो अर्थ ऑर्बिट उपग्रह संप्रेषण कंपनीसोबत दोन प्रक्षेपण सेवा करारांवर स्वाक्षरी केली होती.