अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा परिसर दुमदुमला..!
अक्कलकोट :दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त..! सद्गुरू श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा परिसर दुमदुमला..! दीपावलीची सुट्टी असल्याने राज्यासह परराज्य, परदेशातील भाविक तीर्थक्षेत्र नगरीत दाखल झाले, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी भक्तांच्या व्यवस्थे बाबत काळजीपूर्वक सतत कार्यमग्न होते.
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली मंडळाकडून भक्तांकरिता महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आल्याने लाखो स्वामी भक्तातून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन दिवसापासून दु. ५ वाजेपर्यंत महाप्रसाद सेवा दिली जात आहे. याबरोबरच रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद दिला जात आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली महाप्रसाद, यात्रीनिवास, यात्रीभूवान यासह विविध उपक्रम हे लाखो स्वामी भक्तांच्या सेवेर्थ सज्ज होती. या सुट्टीच्या दिनानिमित्त राज्यातील विविध भागातून लाखो भाविक श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये दाखल झाले असल्याने या सर्व स्वामी भक्तांकरिता करण्यात आल्याच्या विविध सोयींमुळे भक्तांना सुलभ रित्या सेवा मिळत असल्याने सकल स्वामी भक्त तृप्त होऊन न्यासाचे कौतुक केले जात आहे.
महाप्रसादा नंतर स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील महाप्रसाद गृह, श्रींची पालखी व आवारात असलेल्या कपिला गाय, तुळशीच्या कट्यासह समर्थ वाटिका, कारंजा, शिवस्मारक, गड, किल्ले, सृष्टी, यात्री निवास, यात्री भुवन, परिसर, शिवचरित्र शिल्प प्रदर्शन, उभी स्वामींची मूर्ती, स्व.लतादीदी यांनी दिलेल्या कार (रथ), परिसरातील प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी स्वामी भक्तांनी गर्दी केली होती.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली न्यासाचे सर्व पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी हे स्वामी भक्तांना सेवा देण्याकरिता कार्यरत आहेत.
या राज्यातून भक्त :
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिवदमन, काश्मीर पंडित व दिल्ली याबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यातून लाखो भाविकांनी दीपावली सुट्टीनिमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतेले.