ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हॅलोविन फेस्टिवलमध्ये मृत्यू तांडव, १५१ जणांचा मृत्यू

सेऊल (दक्षिण कोरीया) : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन महोत्सवात मृत्यूने तांडव घातलं. हॅलोविन फेस्टिवलमध्ये प्रचंड गर्दी लोटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तब्बल १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचं सांगण्यात आले आहे.

दक्षिण कोरियात ३ तीन वर्षानंतर हॅलोविन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना निर्बंधांमुळे हॅलोविन फेस्टिवलच्या आयोजनावर बंदी घालण्यात आलेली होती. हॅलोविन फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी मास्क आणि हॅलोविन वेशभूषा केलेली होती. हॅलोविन फेस्टिवलमुळे सेऊलमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातारण होतं. तरुणांसह लोक मोठ्या संख्येनं आले होते. त्याचवेळी ही घटना घडली.

सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत जवळपास ८२ लोक जखमी झाले आहेत. यातल्या १९ लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!