ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी घेतला उपोषण तात्पुरते मागे, मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

धारशिव : खरीप २०२० च्या पीकविम्यासह यावर्षीच्या पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांचे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेलेल उपोषण आज मागे घेण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

”अतिवृष्टीची मदत उद्या संध्याकाळ पर्यंत देण्याचं व सततच्या पावसाची मदत मंगळवार, बुधवारपर्यंत याबाबत उपसमितीत निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे मी हे उपोषण मागे घेत आहे. या मागण्या पूर्ण नाही झाल्यातर पुन्हा आंदोलन करू”, असे कैलास पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!