ध्यास विश्वसार्ह बातमीचा

व्हॉट्सअ‍ॅपने आपला मासिक अहवाल सादर केला, सप्टेंबर महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने केले तब्बल 26.85 लाख भारतीय खाते बंद

दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी भारतासंबंधी आपला मासिक अहवाल सादर केला. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अहवाल माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत भारतीय मासिक अहवाल अंतर्गत प्रकाशित करण्यात आला आहे. सुरक्षेबाबतीत सर्वच सोशल मीडिया प्लँटफॉर्म कठोर पावले उचलत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने देखील कठोर पाऊल उचललं आहे. हानिकारक कृत्य करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या युजर्सचे खाते व्हॉट्सअ‍ॅप बॅन करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने सप्टेंबर महिन्यात तब्बल 26.85 लाख भारतीय खाते बंद केले आहेत. युजरच्या तक्रारीनंतर विविध खात्यांवर व्हॉट्सअ‍ॅपने काय कारवाई केली याची माहिती देणारा अहवाल व्हॉट्सअ‍ॅपकडून दर महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केला जातो. गैरवापर रोखण्यात व्हॉट्सअ‍ॅप आघाडीवर आहे. युजरच्या सुरक्षेसाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कुत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ज्ञांमध्ये गुंतवणूक केली आहे, अशी प्रतिक्रिया व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत प्रवक्त्याने दिली.

व्हॉट्सअ‍ॅपच्या गैरवापराबाबत बोलताना, हानिकारक वर्तन रोखण्यासाठी संसाधनांचा वापर केला जातो. आमचे लक्ष हानिकारक कृत्य थांबवण्यावर आहे. हानिकारक कृत्य होण्यापूर्वी त्यास थांबवणे योग्य आहे. तसेच अब्युज डिटेक्शन हे खात्याच्या तीन टप्प्यांवर काम करते. नोंदणी, मेसेज करताना आणि नकारात्मक अभिप्रायांना प्रतिसाद देताना, जो युजर रिपोर्ट आणि ब्लॉकच्या माध्यमातून मिळतो, अशा तीन टप्प्यांवर ते काम करते, अशी माहिती देखील मेटाने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!