मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना सक्त वसुली संचालनालय (ED)ने दणका देण्याची तयारी केली आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल अकरा कोटींच्या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीनं जप्त केलेली अकरा कोटींची संपत्ती योग्य असल्याचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॉडीने दिला आहे.
दरम्यान एनएसईएल घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं या संपत्तीवर तात्पुरती जप्ती आणली होती. आता संपूर्ण तपासानंतर या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोड येथील भूखंडावर लवकरच ईडी मार्फत जप्ती येऊ शकते. सरनाईक यांची तब्बल अकरा कोटींची संपत्ती सक्तवसुली संचलनालय ताब्यात घेणार आहे.