सचिन पवार
कुरनुर : भारत जोडो यात्रा दक्षिणेत कन्याकुमारी उत्तरेकडे काश्मीर पर्यंत पाच महिन्यात एकूण तीन हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करणार असून काँग्रेसने देशव्यापी भारत जोडो यात्रेची घोषणा करताना प्रत्येकाला यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं ऐक पाऊल आणि माझं ऐक पाऊल जोडला तर देश जोडला जाईल असेही ते म्हणाले होते. तसेच या यात्रेतून दहशतीच्या राजकारणाला आणि सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, बेरोजगारी, विषमता वाढवणाऱ्या अर्थव्यवस्थेला पर्याय मिळेल, असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या यात्रेमध्ये काँग्रेसच्या युवा नेत्या शितल म्हेत्रे हे सहभागी होणार आहेत. ते सर्व कार्यकर्त्यांना यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केला आहे. याशिवाय येणाऱ्या काही दिवसात या संदर्भात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सविस्तर बैठक घेऊन सांगतील असेही ते म्हणाले.
म्हेत्रे यांच्याकडून सामाजिक संघटनाना सहभागी होण्याचे आवाहन
देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने आहेत महागाई बेरोजगारी आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत असल्याने राजकीय आव्हानाचा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि पुन्हा काँग्रेस सरकार देशात आणण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, या सर्वांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शितल म्हेत्रे यांनी केले आहे.