---Advertisement---

आमदार कल्याणशेट्टी यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद; वाढदिवसानिमित्त सरपंच उमेश पाटील मित्र परिवारातर्फे सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.५ : अत्यंत कमी कालावधीत राजकीय क्षेत्रात गरुड झेप घेतलेले अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त चपळगावचे सरपंच उमेश पाटील व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सरपंच ते थेट आमदार असा राजकीय प्रवास राहिलेल्या आमदार कल्याणशेट्टी यांना अलीकडेच भाजपचे जिल्हाध्यक्ष मिळाले आहे. ही झेप कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा लौकिक सर्वत्र होत आहे,अशीच झेप त्यांनी घेत राहावी, अशा सदिच्छा सरपंच पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार कल्याणशेट्टी हे तालुक्याला लाभलेले दूरदृष्टीचे, संयमी, मित्तभाषी आणि कार्य कुशल नेतृत्व आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. चपळगावला त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे,असे युवानेते बसवराज बाणेगाव यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील, सुरेश सुरवसे,ज्ञानेश्वर कदम, मनोज इंगोले आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!