धोत्री येथील गोकुळ शुगरच्या सत्काराने भारावलो : माजी मंत्री सतेज पाटील;कारखान्यात ५१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन
अक्कलकोट, दि.६ : गोकुळ शुगरने अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये मोठा विश्वास संपादन केला आहे.कारखानदारी क्षेत्रात हे खूप कमी लोकांना जमते.आज जो गोकुळ परिवाराच्यावतीने शिंदे कुटुंबाने माझा सन्मान केला त्याने मी भारावलो आहे,असे गौरवोद्गार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काढले.रविवारी धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्याला त्यांनी सदिच्छा भेट दिली.त्यावेळी आयोजित कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्यावतीने उत्पादित केलेल्या ५१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे,तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन
सुनिल चव्हाण,मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे,उस्मानाबाद जनता बँकेचे माजी चेअरमन ब्रिजलाल मोदानी,जनरल मॅनेजर प्रदीप पवार, केन मॅनेजर रामचंद्र शेंडगे,शेती अधिकारी फकरोद्दीन जहागीरदार,वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे,सरपंच व्यंकट मोरे,राजु चव्हाण,कार्तिक पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना पाटील म्हणाले,कारखानदारी क्षेत्रात शिंदे व चव्हाण परिवाराने चांगले स्थान निर्माण केले आहे.गोकुळची वाटचाल शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू आहे.यासाठी स्व.भगवान
शिंदे यांचा त्याग देखील लाखमोलाचा आहे.त्यांच्याजवळ दुरदृष्टी होती.म्हणून हे स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे.यात चेअरमन दत्ता शिंदे व त्यांचे बंधू कपिल
शिंदे यांची मेहनत पण फार महत्त्वाची आहे.
ते सतत शेतकरी वर्गाच्या हिताचे निर्णय घेतात.दुग्धव्यवसायासाठी या भागात प्रयत्न व्हावेत.साखरेसोबत दुग्धव्यवसाय वाढला तर आणखी शेतकऱ्यांचा विकास होतो,त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे,असेही ते म्हणाले.माजी मंत्री चव्हाण म्हणाले,गोकुळचा कारखाना अत्याधुनिक आहे.त्यामुळे ऊस परिपक्व झाल्याशिवाय गाळप करणे चुकीचे आहे.
यामुळे शेतकरी व कारखाने अडचणीत येतील.कोल्हापुर जिल्ह्यातील ऊस उत्पादनाची पध्दत आपल्या जिल्ह्यात अवलंबली पाहिजे,असेही ते म्हणाले.कारखान्याच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचे सहकार्य आम्हाला खूप लाभले.शेतकरी आनंदी राहावेत यासाठी हवे ते पावले उचलू.पण शेतकऱ्यांना न्याय देऊ.यावेळी भाव पण चांगला देऊ.२६५ चा ऊस १४ महिन्यानंतर घेऊन जाणार आहे.दररोज ६ हजार मेट्रिक टन गाळप होत आहे.ऊसाचा एकही कांडका शिल्लक राहणार नाही.यासाठी यंत्रणा
काम करत आहे.कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधणार असल्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी सांगितले.यावेळी अशोक पाटील,प्रकाश चव्हाण,कृष्णात मोरे,सुनिल कळके,पंकज पाटील,शशीकांत मोरडे,संजय बाणेगाव,नागराज पाटील,दिलीप सोमवंशी,महेश माने,प्रशांत मिटकरे,कार्तिक पाटील,पंकज पाटील,उमाकांत गाढवे, सिद्धाराम भंडारकवठे आदींसह धोत्री परिसर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले तर आभार सरपंच मोरे यांनी
मानले.