अक्कलकोट, दि.7 : लक्षावधी भक्तांचे श्रध्दास्थान श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चालेली भाविकांची गर्दी पाहता श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळापर्यंत स्कॉय वॉक होणे गरजेचे असून गेल्या 8 दिवसापूर्वी पासून सुरू असलेल्या प्रचंड भक्तांचा लोंढा पाहता प्रशासनाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे, या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने आता तरी जागे व्हावे, अन्ं गर्दी कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणून उड्डाणपुलाबाबत न.प. प्रशासकांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी स्वामी भक्तांतून व स्थानिकांतून पुढे येत आहे.
या बरोबरच बुधवार पेठेतील समाधी मठ या ठिकाणी देखील भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, नजीक बसस्थानक असल्याने वर्दळीचा मार्ग असून मठ परिसरातील अतिक्रमणे काढणे व अद्यावत पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे. गेल्या 8 दिवसातील भक्तांच्या गर्दीचा उच्चांक पाहता भविष्यात वाढणारच असल्याने वादळापूर्वीची शांतता म्हणून न.प. प्रशासनाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, बुधवार पेठेतील समाधी मठ या ठिकाणी भाविकांना सुलभ होण्या कामी विविध उपाय योजना आखणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ उड्डाण पूल पादचारी मार्ग हे होणे काळाची गरज आहे.
श्री क्षेत्र अक्कलकोट हे राज्यातील टॉप फाईव्ह मधील तीर्थ क्षेत्रा पैकी महत्वपूर्ण श्री स्थळ असून श्रींच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्य, परदेशातील भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. हे प्रशासनाने जाणून घ्यायला हवे, मात्र तसे होत नसल्याने गेल्या 8 दिवसापूर्वी पासून दर्शनाचा लोंढा पाहता प्रशासन देखील हतबल निर्माण झालेली होती.
श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे दर्शन व महाप्रसादासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट दररोज हजारोंच्या संख्येने परगावचे स्वामी भक्त येत असतात, अन्नछत्र मंडळात वर्षभर भाविकांची प्रचंड गर्दी असते, मंडळात दररोज 15 ते 20 हजारावर स्वामी भक्त महाप्रसाचा लाभ घेतात. गुरूवार, शनिवार, रविवार, सुट्टीचा दिवस, सण, वार, उत्सव, दिवाळी, उन्हाळी सुट्टी, पोर्णिमा, श्री दत्त उत्सव आदींच्या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.
श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानच्या दक्षिण महाद्वार ते अन्नछत्र मंडळ मेन गेट पर्यंतचा मार्ग मुख्य मार्ग असून हजारों स्वामी भक्त या बोळवजार रस्त्यातून चालत मंदिर महाद्वार पर्यंत चालत जातात, हा सर्व परिसर कायम गजबजलेला गर्दीचा भाग आहे. दरम्यान दि. 1 जून 2018 रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक सोलापूर यांनी श्री क्षेत्र अक्कलकोट भेटीसाठी आले असता, सदरची परिस्थिती बघून पादचारी उड्डाण मार्ग उभारणे ही काळाची गरज आहे. अशी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
गर्दीचा त्रास संभाव्य चोर्या, धक्काबुक्की न होता या मार्गावरून भक्तांना सुलभ चालता यावे, भाविकांना होणार्या नाहक त्रासातून सुटका होण्या कामी पादचारी उड्डाण मार्ग हा असून ही योजना तातडीने अमंलात आणणे गरजेचे आहे.
4 जून 2019 ला खासदार डॉ. जयसिध्देश्वार महाराज व तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासह न.प.चे तत्कालीन पदाधिकारी, जिल्हा पालिका आधिकारी (डी.पी.ओ), प्रांत अधिकारी, मुख्याधिकारी यांची तीर्थ क्षेत्र अक्कलकोटच्या विविध विकास कामाची पाहणी करून शहर विकासाचा आढावा नगर परिषदेमध्ये घेण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भक्तांच्या सोईसाठी श्री वटवृक्ष देवस्थान ते अन्नछत्र मंडळा पर्यंत स्कॉय वॉक उभारा, राज्यातील बहुतांशी मंदिराचा परिसर हा हायटेक होत असताना यामध्ये अक्कलकोट मागे राहता कामा नये, भक्तांच्या गर्दीचे प्रमाण वाढतच जाणार आहे, आवश्यक सुधारण्यामध्ये स्कॉय वॉक ही संकल्पना राबविणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी अवर्जून सांगितले होते.
बैठकीनंतर दीड महिन्यातच नगर विकास मंत्रालय यांच्याकडून मंदिर ते अन्नछत्र पादचारी उड्डाण पूल उभारण्या कामी सुधारीत विकास योजनेतील आरक्षण क्र. 44 या जागेबाबतच्या विषयी नगरपरिषदेने ठराव करावा अशा सूचना दिलेले असताना ही नगर विकासाच्या पत्राला विरोध करीत पादचारी उड्डाण मार्गाचा विषय जुलै 2019 च्या न.प. विशेष सभेत नामंजूर करण्यात आला. अशा लोकाभिमुख विकास कामाला विरोध केल्याने गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी स्वामी भक्तांना गर्दीला तोंड द्यावे लागले, याबरोबरच प्रशासनाला ही अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे.
याबाबत सध्याच्या असलेल्या प्रशासकाने उड्डाणपूूल किती गरजेचे आहे. याबाबतचा आहवाल त्वरीत तयार करून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या मदतीने शासनाला कळविण्याची मागणी स्वामी भक्त व स्थानिकांतून होत आहे. याबाबत प्रशासनाने त्वरती दखल घ्यावेत, अन्यंथा संबंधित खाते यास जबाबदार राहिल, असे बोलले जात आहे.
तरी श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळापर्यंत स्कॉय वॉक होणे गरजेचे आहे.