---Advertisement---

कृषिमंत्री सत्तार यांनी केवळ सुप्रिया सुळेंचाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांचा अपमान केला – रेखा तौर

Follow Us:
---Advertisement---

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशाध्यक्षा रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास दहा लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळं राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशाध्यक्षा रेखा तौर अब्दुल सत्तार यांच्याबाबत बोलताना म्हणाल्या की, कृषिमंत्री सत्तार यांनी केवळ सुप्रिया सुळेंचाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांचा अपमान केला आहे. सुप्रिया सुळे यांच्याजवळ इतकं आहे की त्या सत्तार यांच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. यांनी पन्नास खोके ओरबाडून आणले आहेत. त्यामुळं अब्दुल सत्तार जिथं दिसतील त्यांचे कपडे फाडा, जो कुणी त्यांचे कपडे फाडेल त्याला मी दहा लाख रुपयांचं बक्षीस देईल, असं रेखा तौर म्हंटले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!