ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नोट बंदी, जीएसटीवरून खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडले टीकास्त्र

नांदेड : नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रात्री ८ वाजता टीव्हीवर येऊन एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशाती लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यर्थवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.

भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या दिवशीची पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेने झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे मोठे नुकसान झाले, लाखोंच्या संख्येने उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. तर नोटबंदीच्या लहरी निर्णयानेही नुकसान झाले. दोन्ही निर्णयाने देशाचे मोठे नुकसान व केवळ दोन-तीन उद्योगपतींचा फायदा झाला.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही पण मोठ्या उद्योगपतींचे लाहो कोटी रुपयांचे कर्ज मात्र माफ होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भांडवलदाराना विकले जात आहेत. परिणामी तरुणांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. असेही राहुल गांधी म्हणाले. देशात द्वेष पसरवण्याचे काम भाजपा, आरएसएसकडून केले जात आहे. जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपल्याच देशातील जाती-धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपवाले कोणत्या देशाचे राष्ट्रभक्त? असा सवाल विचारत हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!