ध्यास विश्वसार्ह बातमीचा

न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड भारताचे ५० वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली : न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना ही शपथ दिली. डी. वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत. १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या पदावरून निवृत्त होतील.

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळं निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार सरन्यायाधीश उदय लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. आज राष्ट्रपतीभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकत होते. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!