ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जीवनात जय पराजय गरिबी श्रीमंती आली तरी धैर्याने आणि शौर्याने जगले पाहिजे – अभिनव गवी सिद्धेश्वर महास्वामीजी

अक्कलकोट, दि.14 : प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुख विनाकारण घडत नसतात. त्या काही कारण असतात आणि त्याचे कार्य मन हेच करीत असते. सुर्याशिवाय जसे पृथ्वी चालु शकत नाही तसे देहामध्ये मन असल्याशिवाय हालचाल करु शकत नसल्याचे प.पू.श्री.अभिनव गवी सिध्देश्वर महास्वामीजी (कोप्पळ) यांनी मैंदर्गी येथे आयोजित आध्यात्मिक प्रवचन आर्शिवचन प्रसंगी बोलत होते. ते मैंदर्गी येथील श्री शिवचलेश्वर मंदिराच्या प्रांगणात आयोजित आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रम प्रसंगी गवी सिध्देश्वर महास्वामीजी बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले, आपल्या देहाचे डोळे हे पाहण्याचे काम करते, जीभ बोलण्याचे काम करते, हात काम करण्याचे तर पाय चालण्याची क्रिया करीत असले तरी हे आपल्या देहातील मनाशिवाय कार्य करणे शक्य नसल्याचे सांगून मृत व्यक्तीच्या सर्व अवयव असताना अंर्तमन नसल्यामुळे देह निष्क्रिय झालेला असतो.

आपण सर्वजण या जगात यात्रेकरू म्हणून आलो आहोत. आपण सर्वांनी येथे तीन दिवस राहून आरामात जावे. आमच्यासाठी हा तीन दिवसांचा उत्सव आहे. येथे कोणीही कायमचे राहत नाही. जे येतात त्यांनी एक दिवस जावे. त्यामुळे आपण सर्वांनी यात्रेकरू म्हणून जगावे. आपले जीवन सुंदर आहे. कोप्पलचे अभिनव गवी सिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले की, जगायला शिकले पाहिजे.

जन्म हे देवाने दिलेले आमंत्रण आहे. आपण जमविलेल्या मायावी संपत्ती हे मेल्यावर सोबत येत नसते. हे लक्षात ठेवून प्रत्येकांनी जीवन जगले पाहिजे आणि तेही देवाला आवडेल असेच जगले पाहिजे. जीवनात जय-पराजय, गरिबी-श्रीमंती आले तरी आपण धैर्याने व शौर्याने जगले पाहिजे. शिव म्हणजे सत्कर्म करणे, अचल म्हणजे खंबीरपणे उभे राहणे, शिवचलेश्वर म्हणजे एकाग्रतेने उभे राहणे, शिव आपल्या देहात आहे. जे चांगले कार्य करतात त्यांनाच शिवाचा आशीर्वाद मिळतो, असे सांगून त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मैंदर्गी ग्रामदैवत शिवचलेश्वरांचे आत्मदर्शन घडविले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!