गुरुशांत माशाळ
दुधनी : समाधान आणि समृद्धी मिळविण्यासाठी मनुष्य सतत तन- मन लावून प्रेमाने आपले कामे केली पाहिजे तरच आपला दैनंदिन जीवनात समाधान आणि समृद्धी प्राप्त होते, असे प्रतिपादन अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामीजी (कोप्पळ) यांनी केले. ते दुधनी येथे आयोजित पदयात्रा समारोप प्रसंगी बोलत होते. दुधनी शहरात विरक्त मठाचे मठाधीपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या नेतृत्वात अभिनव गवी सिद्धेश्वर महास्वामीजी (कोप्पळ) यांचे भव्य पद यात्रा काढण्यात आली. या पद यात्रेला अक्कलकोट रोडवरील रुपाभवानी मंदिर पासून सुरुवात करण्यात आले. यावेळी मंचावर दुधनी विरक्त मठाचे मठाधीपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी, ष. ब्र. शांतवीर शिवाचार्य माहस्वामिजी हीरेमठ मादन हिप्परगा, ष.ब्र. अभिनव शंभूलिंग महास्वामीजी हिंचगेरा, म. नि.प्र. प्रभूशांत महास्वामीजी विरक्तमठ हत्तीकणबस उपस्थीत होते.
या पद यात्रेत विरक्त मठाचे विश्वस्त सिद्धाराम म्हेत्रे, दुधनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, शिवानंद माड्याळ, सुभाष परमशेट्टी, सिद्धाराम येगदी, राजशेखर सोळशे, सातलींगप्पा परमशेट्टी, काशीनाथ गाडी, शिवानंद हौदे, गुरुशांत ढंगे, सिद्धाराम मल्लाड, राजशेखर दोशी यांच्या सह दुधनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर पद यात्रा नवज्योति गल्ली, कुंभार गल्ली, गांधी चौक मार्गे पुढे जाऊन सिद्धेश्वर मंदिर मार्गे विरक्त मठ जवळ आल्यानंतर पद यात्रेचा समारोप करण्यात आले.
पुढे बोलताना अभिनव गवीसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले की, प्रत्येकाने काही ना काही उद्योग-व्यवसाय केले पाहिजे. उद्योग व्यवसाय करताना त्या कामावर आपला प्रेम असले पाहिजे, उद्योग व्यवसाय करताना स्वार्थासाठी न करता इतरांसाठी देखील केली पाहिजे. असे त्यांनी सांगितले. अभिनव गवीसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रवचन ऐकण्यासाठी दुधनी, सिन्नुर, मैंदर्गीसह इतर गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी, माता भगिनिंसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.