दिल्ली : गॅस ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. देशात लवकरच क्यूआर कोड असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार आहे. याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. सरकारी ऑईल व नैसर्गिक वायू कंपनी इंडियन ऑयलने एलपीजी सिलिंडर्ससाठी यूनिट कोड-बेस्ड ट्रॅक आणि ट्रेस प्रणाली सुरू केली आहे.
QR कोड लावण्यामागे सरकारचा उद्देश्य गॅस चोरी रोखणे आणि सुरक्षा प्रदान करणे आहे. ग्राहक क्यूआर कोडच्या माध्यमातून सिलिंडर चोरी झाल्यानंतर ते ट्रॅक करू शकतील. त्याचबरोबर सिलिंडरच्या गुणवत्तेचे ऑडिट करू शकतील. या कोडच्या माध्यमातून ग्राहकांना सिलिंडरशी संबंधित सर्व माहिती काही मिनिटात मिळेल.