ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करावे; सिईओ दिलीप स्वामी यांच्या अक्कलकोटमध्ये सूचना

अक्कलकोट, दि.१९ : स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा. जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात जागतिक शौचालय दिन व ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान या निमित्ताने तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उप अभियंता खैरादी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी बी एस तुळजापूरे प्रमुख उपस्थित होते. या निमित्ताने स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते करण्यात आले. ग्रामसेवक व सरपंच यांनी पुढाकार घ्यावा. आरोग्याचे मुळ हे पाणी व स्वच्छता आहे. गावातील चांगले वातावरण राहणे साठी मनाची स्वच्छता ठेवा. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतचे वाचन झाल्यास चांगले वातावरण राहण्यास मदत झाली आहे. महिला सक्षमीकरण, गावाची स्वच्छता, गावाची एकी असे अनेक विषय ग्रामगीतेत आहेत. संत सावता माळी यांनी कामांस प्राधान्य दिले. त्यानुसार ग्रामपंचायतीचे विकासासाठी चांगले सरपंच व ग्रामसेवक यांनी गावाचे नियोजन करावे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपण राबवा. ग्रामगिेतेमधील विचारानुसार हे अभियान आहे, असेही ते म्हणाले. सरपंच यांना ग्रामपातळीवर सह्याचे अधिकार आहेत.याचा वापर ग्रामविकासासाठी करण्यात यावा. नुसते अभियान राबविले जाणार नाही तर यांचे मुल्यांकन केले जाणार आहे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावी पणे राबवा असे आवाहन करण्यात आले.

जागतिक शौचालय दिनाचे औचित्याने ग्रामपंचायत सक्षमीकरणातील स्वच्छतेचे बाबी पुर्ण करा,असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी केले. उपअभियंता खैरादी यांची कार्यकारी अभियंतपदी निवड झाल्याबद्दल स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्यासह विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

दोन कोटी रुपयांचे सायकल वाटप

सोलापूर जिल्ह्यातील सायकल वाचून वंचित असलेल्या मुलींना ३२०० सायकली वाटप करणेत आले आहे. आणखी ३ हजार सायकली वाटप करण्यात येणार आहेत. लोकवर्गणीसाठी भरभरून प्रतिसाद असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!