ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उस्मानाबादच्या कार्यक्रमात अजितदादांनी केली गोकुळ शुगरची अस्थेने चौकशी; पवार आणि शिंदे यांच्या जवळीकतेविषयी तालुक्यात चर्चा

राजकीय चर्चेला उधाण

 

विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : राज्याचे विरोधी पक्षनेते
तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे
आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते.त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात गोकुळ शुगर धोत्री कारखान्याच्या गाळप हंगामाविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली.त्यावेळी चेअरमन दत्ता शिंदे यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. पण माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी अतिशय अस्थेने गोकुळ कारखान्याविषयी माहिती घेतल्याने उपस्थितांमध्ये पवार आणि शिंदे यांच्या जवळीकतेची एकाच जोरदार चर्चा रंगली होती.धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना हा अत्याधुनिक पद्धतीचा आहे.या कारखान्याला खास पवार यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती.त्यावेळी शिंदे
यांच्या कारखानदारीच्या अभ्यासाबद्दल आणि त्यांच्या कारखान्याबद्दल मोठे कौतुक केले होते.त्यावेळी संपूर्ण कारखान्याची पाहणी करत अशा प्रकारचा युनिट आमच्याकडे उभा करण्याचा निश्चय मनामध्ये केला
होता. कारखान्याच्या तोच धागा पकडत कारखान्याच्या प्रगतीविषयी त्यांनी आज चेअरमन दत्ता शिंदे यांच्या बरोबर चर्चा केली आणि अडचणीबाबत मार्गदर्शन
केले. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणात शिंदे यांचा दबदबा वाढत आहे.या पार्श्वभूमीवर पवार यांनी आस्थेने केलेली चौकशी ही त्यांचे
राजकीय वजन वाढवणारी आहे,अशी चर्चा जाणकारांमध्ये सुरू आहे. यापूर्वी कारखान्याला माजी आरोग्य मंत्री राजेश
टोपे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन कारखान्याचे कौतुक केले होते.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील एका यात्रेच्या कार्यक्रमात त्यांनी आपण वडिलांची आमदारकीची अपूर्ण इच्छा पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजितदादा पवार यांची भेट झाल्याने तालुक्यात चर्चेला
उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!