---Advertisement---

संतापजनक : सहावीच्या शाळकरी मुलीवर धक्कादायक ॲसिड हल्ला !

By team
On: March 18, 2026 10:42 AM
Follow Us:
---Advertisement---

अहिल्यानगर : वृत्तसंस्था  

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीतील एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात युवकाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढल्याने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी शाळेतून घरी जात असताना अचानक समोर आलेल्या युवकाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. मुलीने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीला धावले, परंतु आरोपी त्या वेळी फरार झाला. पीडित मुलीला तातडीने लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले असून संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. ॲसिड फेकणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी संगमनेरमधील रणखांब गावात लग्नास नकार दिल्याने एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच शाळकरी मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्तीबद्दल माहिती दिल्यास तपासास मदत होईल, असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!