संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२७व्या जीवन समाधी सोहळ्या निमित्त कुरनुर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कुरनूर दि.२२ : कैवल्य साम्राज्य व ज्ञान चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संगमतीर्थ स्नान पूजन भजन भोजनाचा महासोहळा कुरनूर येथील बोरी व हरणा नदी या संगमावर असलेल्या नागेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. गेली नऊ वर्षे ही परंपरा सुरू असून मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.
नाव जल परिक्रमा यात्रा निमित्त अभिषेक सेवा नैवथ्या आवळी भोजन व गंगा पूजन नाम संकीर्तन भजन सेवा संपन्न होत आहे. यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास सहभाग होण्याचे आवाहन आयोजकांनी केला आहे.
यामध्ये सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन देवाचे नामस्मरण करतात. आणि निसर्गाच्या सानिध्यात एकत्र बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतात. यामध्ये प्रामुख्याने कुरनूर आणि बावकरवाडी या गावचे समस्त ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे आनंदाने साजरा करतात.