ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्र शासनाच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहातीला अचानक लागली आग,अन्नछत्र मंडळाच्या अग्निशमन दलामुळे अक्कलकोटमध्ये मोठी हानी टळली !

अक्कलकोट : येथील राजे फत्तेसिंह क्रीडांगणा लगत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहातीला अचानक गुरुवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीला विझवण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अग्निशामक वाहन त्वरित दाखल झाल्याने लाखो रुपयांची नुकसान व जीवित हानी टळण्यास मदत झाली आहे.

अधिकारी वसाहातीत सकाळी साप-सफाई करण्यासाठी दोन कर्मचारी कार्यरत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्याप्रमाणात धूर येत असल्याचे हम रस्त्यावरील नागीरिक पाहताच घटना स्थळी पोहचले असता आग विजावण्यास प्रयत्न करीत असताना सामाजिक कार्यकर्ते अमिन मुजावर यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना भ्रमणध्वनीवरून सदरचे माहिती देताच त्वरित अमोलराजे भोसले यांनी न्यासाचे अग्निशामक वाहन घटनास्थळी पटविण्याची व्यवस्था केले. त्यामुळे तात्काळ अग्निशामक वाहन दाखल झाल्याने लाखो रुपयांची नुकसान व जीवित हानी टळण्यास मदत झाली आहे. नंतर नगरपालिकेने ही आग विझवण्यासाठी सहकार्य केले.

याबबत बोलताना पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय पायघुणे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहातीला गुरुवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीला विझवण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अग्निशामक वाहन त्वरित दाखल झाल्याने लाखो रुपयांची नुकसान व जीवित हानी टळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे न्यासाचे संथापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचे ऋणी आहोत.

मोठी हानी टळली

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अग्निशामक वाहन वेळेवर आल्याने मोठे नुकसान टळले आहे. दवाखान्या शेजारी असलेले नगर परिषदेचे रवींद्रनाथ टागोर वाचनालय, खेडगी महाविद्यालय, नजीकच क्रीडा संकुलनातील ईनडोर स्टेडीयम व पशु वैद्यकीय उपचार केंद्र कक्ष व बायपास रस्त्यावर हॉटेल, दुकान ही आग आटोक्यात आल्याने मोठी हानी टळण्यास मदत झाली आहे.

यावेळी घटनास्थळी मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोटचे अध्यक्ष अरविंद पाटील, जेष्ठ पत्रकार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी संचालक प्रशांत भगरे, जब्बार बागवान, सुधीर धायगोडे, न्यासाचे कर्मचारी वैजनाथ स्वामी, समर्थ मिनगिले, सलीम हगलदिवटे, दीपक नडगेरी उपस्थित राहून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!