ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात 20 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 79.30 टक्के मतदान, 25 हजार 500 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

अक्कलकोट, दि.18 : अक्कलकोट तालुक्यात पार पडलेल्या 20 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 79.30 टक्के मतदान झाले असून 25 हजार 500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही ठिकाणी किरकोळ वाद-विवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिरसट यांनी दिली आहे.

यामध्ये बोरगाव दे. (3006 पैकी 2381 मतदान), पालापूर (810 पैकी 407), घोळसगाव (2355 पैकी 1762), सुलतानपूर (717 पैकी 612), बोरगाव (1160 पैकी 991), दर्शनाळ (1195 पैकी 1020), अरळी (1607 पैकी 1371), दहिटणेवाडी (668 पैकी 583), शिरवळवाडी (1144 पैकी 953), सदलापूर (1492 पैकी 1149), शिरवळ (3313 पैकी 2002), कोन्हाळी (1554 पैकी 1165), हालचिंचोळी (1006 पैकी 813), अंकलगे (1591 पैकी 1333), खानापूर (1464 पैकी 1195), रुद्देवाडी (1094 पैकी 949), आंदेवाडी ज (790 पैकी 666), हत्तीकणबस (1598 पैकी 940), सलगर (4344 पैकी 3056), नाविंदगी (2509 पैकी 1955) असे एकूण 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 33 हजार 417 पैकी 26 हजार 500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी 79.30 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिरसट यांनी दिली आहे.

मतदान झालेल्या सर्व गावामध्ये किरकोळ वाद-विवादाचे घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे. मंगळवार, दि.20 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे.

सर्व बूथ केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अक्कलकोट उत्तर पोलिस व अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!