ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाचनाने साहित्यिक घडला जातो, अक्कलकोटमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन, मुसाप साहित्य पुरस्कारांचे वितरण

अक्कलकोट, दि.३० : जीवनामध्ये साहित्य असले म्हणजे मनुष्याच्या ज्ञानात भर पडते, साहित्य टिकविण्यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचनाने साहित्यिक घडला जातो, समाजाला साहित्यिकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. अक्कलकोट सारख्या ठिकाणी साहित्याची चळवळ आहे ही अभिमानाची गोष्ट आहे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे होते. श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे पाॅलीटेक्नीक काॅलेज येथे अक्कलकोट साहित्य परिषदेच्या वतीने श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रास्ताविक शाखेच्या अध्यक्षा सौ.शैलशिल्पा जाधव यांनी केले. यावेळी व्यासपीठावर श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, मसापचे जिल्हा प्रतिनिधी पदमाकर कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष अशपाक बळोरगी, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जून पाटील, प्राचार्य नागनाथ जेऊरे, प्राचार्य गणपती वाघमोडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी साहित्याकडे वळले पाहीजे. साहित्य वाचनाने ज्ञानात भर पडते, असे सिध्दाराम म्हेत्रे म्हणाले. इस्लामपूरचे ज्येष्ठ साहित्यिक अॅड. बी.एस.पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शंकर – सिध्दाराम प्रतिष्ठानचे प्रशिक्षक धनराज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक पोलीस दलात भरती झाल्या मुळे, अक्कलकोट तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन जाधव यांची निवड झाल्याबद्दल, समाजकल्याण विभागा मार्फत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मृणाल करजगीकर यांचा सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अॅड. बी.एस.पाटील यांनी साहित्यने नेहमीच समाज घडवण्याचे कार्य केले आहे. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरती काळे व राजु भोसले यांनी केले.

याप्रसंगी दिनकर शिंपी, दत्तात्रय बाबर, अॅड. प्रशांत शहा, लक्ष्मण पाटील, सुभाष सुरवसे, प्रा. भिमराव साठे, प्रभाकर गुरव, शंकर पवार, पुष्पा हरवाळकर, बाबा निंबाळकर, सुभाष गडसिंग, काशिनाथ भदगुणकी, मल्लिकार्जून काटगांव, प्रा. नारायणकर,सिध्दार्थ गायकवाड, किरण जाधव, यश जाधव, मोहन चव्हाण, महादेव शिरसाठे,स्नेहा नरके, सगरी शिवराज स्वामी, कमलाकर जाधव, सचिन घंटे,बसवराज आळ्ळोळी, रामचंद्र समाणे आदी उपस्थित होते. आभार बापुजी निंबाळकर यांनी मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!