२०२३ या नव्या वर्षात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्या कोण असणार? नावे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आपल्या नव्या वर्षाची प्लॅनिंग जाहीर केले आहेत. २०२३ या नव्या वर्षात काय करणार आहेत आणि त्यांच्या निशण्यावर कोण-कोणते नेते आहेत या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या नेत्याच्या यादीत ठाकरे परिवार, शिवसेनेचे नेते अनिल परब, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, कॉँग्रेसचे नेते असलम खान, मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिका यांचे नावे आहेत.
उद्या पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात
ठाकरे परिवाराचे १९ बंगले
अनिल परब
हसन मुश्रीफ
असलम खान चे स्टुडिओ
किशोरी पेडणेकर एस आर ए सदनिका
मुंबई महापालिका
यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/DLR2ie7z1g
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
किरीट सोमय्या यांनी ट्विट केलेल्या यादीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावे त्यांनी जाहीर केले आहेत. किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर कायम शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे होती. यातील शिंदे गटात गेलेल्या शिवसेना नेत्यांची नावे वगळण्यात आली असली तरी इतर नावे अजूनही तशीच आहेत