भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत उर्फीवर साधला निशाणा, वाघ म्हणाल्या, आजही सांगते उर्फी जावेद समोर आली तर…
मुंबई : चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्हे दिसत नाही. भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा उर्फी जावेदला इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कमी कपडे का घातले याचं कारण सांगितले होते. त्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला देण्यासाठी आमच्याकडे अॅलर्जीच्या गोळ्या असल्याचे उत्तर दिले आहे. वाघ म्हणाल्या, आजही सांगते उर्फी जावेद समोर आली तर तिला आधी तिला साडी चोळी देऊ. मात्र, त्यानंतरही तिनं तीचा नंगा नाच सुरु ठेवला तर तिचे थेट थोबाड फोडणार आहे, उर्फीला कपड्यांची ऍलर्जी असेल तर सगळ्या प्रकारच्या गोळ्या देण्यास सक्षम असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या. सध्या मुंबईच्या रस्त्यांवर नंगा नाच सुरु आहे. तो थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, काहींनी या प्रकरणात उगाच उड्या घेतल्या आहे. दरम्यान, त्यांनी महिला योगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. वाघ म्हणाल्या, महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत आहे. एकीला जाब विचारायचा आणि दुसरीला गोंजरायचे अशी वागणूक आयोगाची आहे. महिला आयोग म्हणजे रुपाली चाकणकर एकट्या नाहीत. त्यांनी मला नोटीस पाठवली. अशा ५६ नोटीसा रोज येत असतात. नोटीस पाठवताना आयोगाच्या सदस्य असलेल्या पोलिस आयुक्तांची मंजुरी घेतली का? असा सवालही त्यांनी केला