---Advertisement---

भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हन्नुर येथे ९५ जणांचे रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.६ : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमीत्त हन्नुर (ता.अक्कलको येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात ९५ जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड होते.व्यासपीठावर बाळासाहेब मोरे, तुकाराम बिराजदार,अशपाक अगसापुरे,दिलीप बिराजदार, विश्वनाथ भरमशेट्टी,डॉ.नेहा भरमशेट्टी,राजकुमार भरमशेट्टी,क्रांती दर्गोपाटील,शिवराज गड्डे,विश्वनाथ भोसले,चंद्रकांत जंगले,निलप्पा घोडके,
रामचंद्र सुतार,निरंजन हेगडे आदींची
प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या
हस्ते भरमशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन
करण्यात आले.मोरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी गायकवाड,मोरे, चंद्रकांत जंगले आदींनी मनोगत व्यक्त करत भरमशेट्टी यांच्या आठवणींना उजाळा दिला.पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसेच स्व.भरमशेट्टी यांच्यावर आधारित दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले.यावेळी अरुण भरमशेट्टी, नागु जकीकोरे,सिध्दप्पा भकरे,तिपण्णा हेगडे,नरेंद्र जंगले,अप्पु हताळे,गुरुपादप्पा बिडवे,नागनाथ पाटील,सूरेश हेगडे,सिध्दप्पा पुजारी,अॅड.विशाल भरमशेट्टी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी आश्विनी व सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.बी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन गुरुनाथ पारतनाळे यांनी केले तर आभार सोपान
निकते यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!