सोलापूर मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात कामतीचा अमोल यादव तर महिलांमध्ये केनियाची मोयुंगा क्रिस्टाईनने मारली बाजी
सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आपटे डेअरी आंतरराष्ट्रीय सोलापूर मॅरेथॉनमध्ये 21 किलोमिटर पुरूष गटात सोलापूर जिल्ह्यातील कामतीचा अमोल यादव तर महिला गटात केनियाची मोयुंगा क्रिस्टाईन हिने प्रथम क्रमांक मिळवत विजय संपादन केले.
गेल्या सहा महिन्यापुर्वीपासून तयारी करण्यात येत असलेल्या सोलापूर रनर्स असोसिएशनच्या सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी पार पडली. 21 किलोमिटर, 10 किलोमिटर आणि साडेतीन किलोमिटर अशा तीन गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत जवळपास 3 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉनपुर्वी दर रविवारी धावपटूंसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. सोलापूर शहर जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेरील आणि देशाच्या बाहेरील म्हणजेच केनिया या देशातील धावपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. पहाटे 5 वाजता सर्व धावपटूंना एकत्र करून हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर वॉरमाप तसेच झुंबा डान्स घेण्यात आला. त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या समोर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते 21 किलोमिटर मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 6.30 वाजता त्यानंतर 6.45 वा. 10 किलोमिटर मॅरेथॉन स्पर्धेलाही झेंडा दाखवून सुरूवात झाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता फन रन म्हणजेच साडेतीन किलोमिटरच्या मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
21 किलोमिटरची मॅरेथॉन ज्ञानप्रबोधिनीपासून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता शासकीय विश्रामगृहासमोरून पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौकातून डाव्या बाजुला वळून भारती विद्यापीठ, डी मार्ट समोरून, टाकळीकर मंगलकार्यालय समोरून पुन्हा विजापूर रोड सैफूलमार्गे एसआरपीएफ कॅम्प पासून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप करण्यात आली तसेच 10 किलो मिटरची ज्ञानप्रबोधिनी पासून सुरूवात होवून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता शासकीय विश्रामगृहासमोरून, पत्रकार भवन, विजापूर नाका,आयटीआय चौकातून डाव्या बाजुला वळून भारती विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय समोरून माघारी फिरून पुन्हा त्याच मार्गाने येवून ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप झाली. तसेच फन रन साडेतीन किलोमिटरची मॅरेथॉन ज्ञानप्रबोधिनी पासून सुरूवात होवून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यां धावपटूंना आमदार प्रणिती शिंदे, स्पर्धेचे प्रायोजक आपटे डेअरीचे आल्हाद आपटे, विनय आपटे, सारंग आपटे, गायत्री आपटे, शार्दुल आपट तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
विजेते-
21 किलोमिटर पुरूष –
◆ प्रथम अमोल यादव 1 तास 13 मिनिटे 21 सेकंद
◆ द्वितीय- लॅग्वट कॉलीन्स 1 तास 14 मिनिटे 41 सेकंद
◆ तृतिय – शिवाजी हाके 1 तास 17 मिनिटे 12 सेकंद
21 किलोमिटर महिला –
◆ प्रथम मोयुंगा क्रिस्टाईन 1 तास 23 मिनिटे 28 सेकंद
◆ द्वितीय – सपना पटेल 1 तास 31 मिनिटे 24 सेकंद
◆ तृतिय – सविता क्षिरसागर 2 तास 7 मिनिटे 14 सेकंद
10 किलोमिटर पुरूष –
◆ प्रथम – शुभम भोसले 34 मिनिटे 40 सेकंद
◆ द्वितीय- अजय बिंद – 37 मिनिटे 45 सेकंद
◆ तृतिय- वैभव बबलादी- 38 मिनिटे 56 सेकंद
10 किलोमिटर महिला –
◆ प्रथम – साक्षी सरगर – 40 मिनिटे 28 सेकंद
◆ द्वितीय- सुरेखा मातणे – 44 मिनिटे 11 सेकंद
◆ तृतिय – श्रध्दा हाके- 48 मिनिटे 47 सेकंद
क्षणचित्रे – सोलापूरमधील डॉक्टरांच्या पुढाकाराने यशस्वी नियोजन, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकासह चिमुकल्यांचाही सहभाग, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांचा सहभाग, मॅरेथॉन मार्गावर पाणी, एनर्जी ड्रिंक, बायो टॉयलेट व्यवस्था, सर्व सहभागी धावपटूंसाठी चहा नाष्टा, धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गावर हलगी, ढोलीबाजा आणि दुतर्फा नागरीकांची गर्दी, मॅरेथॉनपुर्वी झुंबा डान्स तसेच शंखनाद, देशभक्तीच्या घोषणांचा दणदणाट, धावपटूंसाठी फिजिओथेरपीची व्यवस्था, अग्निशामक दल, अँब्युलन्स तसेच तज्ञ डॉक्टर तैनात, वाहतुक व्यवस्थेसाठी पोलीसांचे योग्य नियोजन, महानगर पालिका आरोग्य विभागाकडून स्वच्छता, पोलीसांकडून चोख बंदोबस्त, सर्व धावपटूंना स्पर्धे नंतर मेडल देण्यात आले तसेच सेल्फी पॉईंटही करण्यात आले होते. मॅरेथॉन नंतर ह.दे. प्रशालेच्या मैदानावर धावपटूंचे जल्लोषात नृत्य
परिश्रम घेणारे – सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरेक्टर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन बलदवा, डॉ. गोरख रोकडे, डॉ. गुरू जालीमिंचे, डॉ. किरण किणीकर, डॉ. महेश बिलुरे, डॉ. प्रदीप भोई, डॉ. सुभाष भांगे, अभय देशमुख, अजित वाडेकर, बसवराज कडगंची , संजय सुरवसे, जयंत होलेपाटील, श्रीनिवास संगा, स्वप्नील नाईक, रोषण भुतडा, ओंकार दाते, डॉ. विठ्ठल कृष्णा, नूमवि आणि ह.दे.प्रशालेचे मुख्याध्यापिका, शिक्षक कर्मचारी तसेच अॅथलेट्निस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि जिल्हा क्रिडा शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे मोलाचे सहकार्य सोलापूर मॅरेथॉनला लाभल्याने ही मॅरेथॉन यशस्वीपणे पार पडली.