ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंदेवाडी गावच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – शितल म्हेत्रे ; आंदेवाडीच्या सरपंचपदी जगदेवी धोडमनी तर उपसरपंचपदी ज्योती कलमनी

कुरनूर : आंदेवाडी गावच्या विकासासाठी सदैव म्हेत्रे परिवार कटीबद्ध असून या गावाने काँग्रेस पक्षावर प्रेम दाखवून वर्चस्व प्राप्त केले आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानते. यापुढेही असेच सहकार्य असावे, अशी अपेक्षा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शितल म्हेत्रे यांनी व्यक्त केली. आंदेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच आणि उपसरपंच सदस्यांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना शितल म्हेत्रे म्हणाल्या की,येणाऱ्या काळामध्ये सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मिळून गावच्या विकासासाठी सदैव तत्पर असतील. याचा मला सार्थ विश्वास आहे. यावेळी सरपंचपदी धोडमनी तर उपसरपंचपदी कलमनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये शावरसिध्देश्वर ग्रामविकास पॅनलकडून ज्योती कलमनी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडची घोषणा करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत लाळगे यांनी जाहीर केले. ग्रामसेवक कलशेट्टी यांनी सहकार्य केले. यावेळी बोलताना नूतन उपसरपंच कलमनी म्हणाल्या की ,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व अणाराव करवीर यांच्या सहकार्याने गावचा विकास करु. आंदेवाडी गावाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर युवा नेत्या शितल म्हेत्रे व चेअरमन करवीर यांच्या हस्ते नूतन सदस्य व सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!