---Advertisement---

जयहिंद शुगरकडून १५ डिसेंबरपर्यंतची ऊसबिले अदा ; चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट ,दि.६ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा केली असल्याचे कारखान्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दास अनुसरून कारखान्याकडून बिल वेळेवर अदा करण्यात येत आहेत. यासोबतच वाहतूकदार, ठेकेदार यांचीही बिले अदा केल्याचे माने देशमुख यांनी सांगितले. यंदाचा गाळप हंगाम यशस्वीपणे सुरू असून दररोज साधारणतः ९ हजार मेट्रिक टन गाळप होत आहे.या हंगामात आतापर्यंत ४ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी परिपक्व ऊसाचा पुरवठा कारखान्यास करावा.यातुन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक बब्रुवान माने देशमुख, व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर पी देशमुख, शेतकी अधिकारी जेऊरे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!